कविता का रचली जाते
/2012-04-18 18:40/एक चर्चाप्रस्ताव.
माणूस कविता का करतो.
माझे मतः
खालील कारणांमुळे असावे.
१. गुणगुणता येईल असा व सोप्या पद्धतीने अर्थ मनात उतरेल असा हा एकच भाषिक प्रकार आहे जो त्या विशिष्ट भाषेतल्या (किंवा इतर भाषेतल्या शब्दांची निवडही - कवीचा चॉईस) शब्दांमधून स्वतःला हव्या त्या आकृतीबंधात रचता येतो
२. हा एक छंद आहे व कविता म्हणून 'काहीही' लिहिणारा माणूस निदान काही मर्यादीत वर्तुळात तरी 'कवी' गणला जातो, जे त्या माणसाला आवडते.
माणसाचे आयुष्य गद्य शैलीत चाललेले असते. काव्यमय शैलीत आयुष्यात जवळपास शून्य घटना घडतात. जवळपास संपूर्ण मानवी संवाद गद्य असतो. कोणत्याच प्रसंगात आपण प्रत्यक्ष लाईव्ह परिस्थितीवरील भाष्य काव्यातून करत नाही. मग माणूस कविता का करतो?
आपल्याला काय वाटते, कृपया अवश्य नोंदवा
धन्यवाद
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.