'' तुझ्या माझ्या घावांचं
नाही एकच कारण;
त्यांनी दिला तुला दगा
मी गेलो नाही शरण!
तुला मला आता
पेटून उठलं पाहिजे;
अन्यायाचं तण
पुन्हा एकदा उपटलं पाहिजे!
तुझ्या माझ्या अश्रूंची
एकच आहे जात;
चल चिरडू दोस्ता
ह्या शोषकांची जमात...! ''
--- मिलिंद देविदास हिवराळे
मो. ९४२३६०१३२०