गल्लीमध्ये गेल्या वर्षी इतके काही झाले
कोणी विधवा झाले कोणी अनाथसुद्धा झाले
कोणाच्याही मृत्यूबाबत आधी कळले नव्हते
कळले असते तरी जायचे हेही नक्की नव्हते
कळले नाही हे मरणारे होते कोण कुणाचे
नुसते कानावरती पडले आक्रंदन लोकांचे
कोणाच्या जगण्याला पडला खड्डा देवच जाणे
माझ्या लेखी आले, जगले अन मेले नियमाने
त्यांच्या तेराव्याला कोठे बोर्ड लागला नाही
आदरांजली करिता कुठली सभा जाहली नाही
आनंदाने सारे केले असते नक्की त्याचे
--
--
--
--
नाव कदाचित गाजत असते त्यात कुणा एकाचे
-----
'कणखर'