बिर्‍हाड

टीचकीभ्र प्रकाश
तसे आसमंत हसले
मिळेल त्या कुसाले
संसार नवे वसले...

घोडी,घागर,तवा
रात्री मिनमीन दिवा
पाषाणाच्या फ्टीले
भाजीभाकर शिजले...

कोठुन कोठे जायचे
काय नवे पाहायचे
श्रम झाले, थकले
समाधानी झोपले...

उन, पाऊस, वारा
पोसला सारा फेरा
ना कधी का रुसले
कुठे कधी त्रासले...

ना ठाऊक नफातोटा
दिनरात कसेही रेटा
मोकळ्या कड्याले
बिर्‍हाड नवे वसले...

प्रतिसाद

व्वा

उन, पाऊस, वारा
पोसला सारा फेरा

व्वा

कविता आवडली.

भाषा

मोकळ्या कड्याले
बिर्‍हाड नवे वसले>> व्वा व्वा

कवितेतील भाषेचे हे व्हर्जन फारच आवडले

कविताही मस्तच

अभिनंदन